सातारा : राजवाडा बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आरडाओरडा करून शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.