शेत मजुरीच्या पैशावरून आर्डे येथे एकाच्या खून; आठ जणांवर गुन्हा दाखल, गावात भितीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 20 May 2026


मेढा  :  आर्डे, ता. जावली येथे मजुरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून आगतराव बाबुराव जाधव (वय  57)  यांचा मारहाणीमुळे मृत्यु झाला असून सविता आगतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे आर्डे गावात भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी बदोबस्त ठेवला असल्याचे समजते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी दिपक जाधव व सुनिता विलास जाधव यांच्याकडे आगतराव बाबुराव जाधव शेतमजुरीने केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. पैशाची मागणी केल्याच्या रागाने रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, अदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओकार विलास जाधव आणि विलास शामराव जाधव (सर्व रा.आर्डे) यांनी कु-हाड, काठी यांनी संगनमत करून आगतराव बाबुराव जाधव यांना मारहाण केली. 

यामध्ये डोक्याला जखम होऊन त्यांचा मृत्यु झाला असल्याची फिर्याद त्यांची पत्नी सविता आगतराव जाधव यांनी दिली असून आठ जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे घरामध्ये दि. १९ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून अधिक तपास सपोनि सुधिर पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलगा होत नाही म्हणून दुर्गा पेठेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
'चाफ्याची फुले' ग्रामसंस्कृतीचा जिव्हाळा जपणारी - चंद्रकांत कांबीरे; कवी विश्वजित जाधव यांच्या 'चाफ्याची फुले' कवितासंग्रहाचे प्रकाशन

संबंधित बातम्या