सातारा : विवाहित महिलेला मुली होत असून मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडेपीर कच्छी बिल्डिंग परिसर, पोलीस करमणूक केंद्र, दुर्गा पेठ, सातारा येथे ही घटना घडली आहे.फिर्यादीच्या लग्नानंतर तीन महिन्यांपासून ते १८ मे २०२६ दरम्यान हा छळ सुरू होता. फिर्यादी बीबी आयेशा शादाब मुल्ला (वय २६, रा. दुर्गा पेठ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,तुला मुलीच होत आहेत,मुलगा होत नाही “तू तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये” अशी मागणी करत मारहाण व मानसिक त्रास दिला जात होता.
या प्रकरणी पती शादाब हजरत मुल्ला, दीर सलमान हजरत मुल्ला, नणंद मुस्कान जुबेर शेख, सासू शबाना हजरत मुल्ला व सासरा हजरत हसन मुल्ला (सर्व रा. मुजावर कॉलनी, बाराडबरा, आर. एस. मंगल कार्यालयापुढे, कराड, ता. कराड, जि. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.