महिलेला मारहाण व विनयभंगप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा; फरशी फोडून ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा :  ५६ वर्षीय महिलेवर मारहाण करून विनयभंग केल्याचा तसेच मालमत्तेची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ रोजी सकाळी सुमारे ८ वाजता सातारा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या वडिलोपार्जित घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत शेजारी राहणारा सुदाम भैरू भोसले हा आला व त्याने शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादीने विरोध केल्यावर त्याने तिचे अंगावरील कपडे फाडून अंगाला स्पर्श करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी मालन कांबळे, नलिनी कांबळे व रंजना (पूर्ण नाव माहिती नाही) यांनीही हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सुदाम भोसले याने शेडमध्ये टाकलेली फरशी फोडून सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान केले व “तुला इथेच गाडून टाकतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी सुदाम भैरू भोसले, मालन कांबळे, नलिनी कांबळे व रंजना (रा. लिंब, ता.  सातारा) यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीतील जोशी वाड्यात एकास मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
मुलगा होत नाही म्हणून दुर्गा पेठेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या