सातारा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना गोडोली येथील जोशी वाड्यात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी जोशीवाडा, गोडोली येथे सचिन हनुमंत मोरे (वय ३५, रा. १५६ जोशी वाडा, गोडोली, सातारा) हे त्यांच्या मामाच्या घरी असताना ही घटना घडली. तानाजी संभाजी जाधव (वय ४५) यांनी हाताने मारहाण केली, तर त्यांचा मुलगा अनुप तानाजी जाधव (वय २५, दोन्ही रा. १४७ जोशी वाडा, गोडोली, यांनी पट्टी कटरने दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी सचिन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करत आहेत.