लग्नास नकार दिल्याच्या रागातून साताऱ्यात तरुणीवर सत्तूरने हल्ला करणाऱ्यावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अमोल जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी एमआयडीसी, ‘कूपर कंपनी ट्रॅक्टर प्लांट’ समोरील रस्त्यावर १७ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना घडली.यावेळी फिर्यादी मानसी प्रकाश देशमुख (वय २७, रा. करंडी, ता. जि. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल जाधव (रा. करंडी, ता. जि. सातारा) याने लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून मटण शॉपमधील सत्तूर आणला.

आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटावर सत्तूरने वार करून तिला जखमी केले. त्यानंतर त्याने त्याच सत्तूरने स्वतःच्या डाव्या हातावरही वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी अमोल जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देखने करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात शिवराज पेट्रोल पंपापासून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर होमगार्डवर हल्ला; चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
गोडोलीतील जोशी वाड्यात एकास मारहाणप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या