सातारा : शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीत हद्दपार आदेशाचा भंग करून फिरताना आढळलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या आदेश क्र. स्थागुशा १५/२५, म.पो.का.क.५५/१९७/२६ दि २३ जानेवारी २०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे संबंधितांना हद्दपार करण्यात आले होते. मात्र या आदेशाचा भंग करून दोघेही शाहूपुरी चौकातील वॉशिंग सेंटरजवळ फिरताना आढळले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम आबासाहेब आडागळे (वय २१, रा. सिद्धिविनायक कॉलनी, हिंदवी पब्लिक स्कूलजवळ, शाहूपुरी, सातारा) आणि अनिकेत सोमनाथ अहिवळे (वय २१, रा. होलार गल्ली, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक रोकडे करत आहेत.