कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सातारा विभागातील एसटीचे तीन अधिकारी निलंबित

by Team Satara Today | published on : 19 May 2026


सातारा : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. विभागीय यंत्र अभियंता विकास माने, विभागीय सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे आणि विभागीय भांडार अधिकारी सचिन गायकवाड अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे एसटी विभागात खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, राज्य परिवहन महामंडळाचे माहिती व तंत्रज्ञान महाव्यवस्थापक विरेंद्र कदम यांनी ८ आणि ९ मे रोजी शिरवळ तसेच पाटण आगारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांना काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. यासंबंधित अहवाल त्यांनी कार्यकारी व्यवस्थापकांना पाठविला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

दोन्ही आगारातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे कदम यांना या दौऱ्यात आढळले. याप्रकरणी विभागीय सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे यांना निलंबित केले. तर विभागीय यंत्र अभियंता विकास माने आणि भांडार अधिकारी सचिन गायकवाड यांना या भेटीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मीळ लेपर्ड कॅट प्रजातीचे दर्शन
पुढील बातमी
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक

संबंधित बातम्या