सातारा : सातारा तालुक्यातील माहुली गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठावर लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याने ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल कचरू कांबळे (वय ३६, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. जि. सातारा) यांनी दि. १८ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना खाजगी अॅम्बुलन्सने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे दाखल करण्यात आले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. वचना सरडगी यांनी तपासणी करून संबंधितास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहितीही डॉ. सरडगी यांनी पोलिसांना दिली. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.