सातारा : सातारा शहरात माजी सैनिक कल्याण विभाागाकडील जागेमध्ये भव्य आणि आदर्श असे माजी सैनिक एकात्मिक अद्ययावत संकुल उभारावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज याविषयी बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकरी सतेश हंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, करंजे येथील माजी सैनिक कल्याण विभागाकडे असलेल्या 11 एकर जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या या संकुलामध्ये भव्य मॉल उभारावा, त्यामध्ये बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी किमान 25 टक्के जागा राखीव असावी. तसेच त्यात कॅफेटेरिया व कॅन्टीनची सोय ही असावी. या जागेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी करावी व नेमण्यात आलेले वास्तुविशारद यांच्याशी चर्चाकरुन 15 दिवसात त्याचा आराखडा तयार करावा. त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास तेथील जुनी बांधकामे काढावीत आणि सद्यस्थितीतील काही कार्यालये व संकुले तात्पुर्ती स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव सैनिक कल्याण कार्यालयाने सादर करावा. सद्यस्थितीत ही जागा राज्यपाल महोदयांच्या मालकीची आहे. जागा अधिग्रहणासाठीचा सविस्तर प्रस्ताव 15 दिवसात सादर करावा. राज्यपाल महोदयांकडे मागणी करुन पाठपुरावा करता यईल.
सातारा येथे उभारण्यात येणारे माजी सैनिक कल्याण संकुल हे राज्यात आदर्श ठरेल असे उभाारावे. तसेच या ठिकाणी भेट देणाऱ्यांसाठी
अद्ययावत सर्व सोयी सुविधा उभरा्व्यात अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.