कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा यांना सात भाषा आहेत अवगत ; महाराष्ट्र कॅडरचे २००६ चे आयपीएस अधिकारी

by Team Satara Today | published on : 17 May 2026


कोल्हापूर : गृह विभागाने राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या केल्या आहेत. त्यात कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा यांची नियुक्ती झाली. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व) च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. महानिरीक्षक शर्मा यांना वाचनाची आवड आहे. त्यांना संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी या सात भाषा अवगत आहेत.

शर्मा पुणे पोलिस सहआयुक्तपदी कार्यरत होते. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले. ते गेली १९ वर्षे पोलिस दलात आहेत. ते महाराष्ट्र कॅडरचे २००६ चे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक, पुणे पोलिस आयुक्तालयात अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाई, पुणे येथील अवैध शस्त्रनिर्मिती रॅकेटविरोधातील कारवाईत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मध्य प्रदेशातील उमरटी गावात पुणे पोलिसांनी केलेल्या छाप्यात शस्त्रनिर्मिती भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. वाहतूक व्यवस्थापन, पोलिस दलातील मनुष्यबळ वाढ आणि शिस्तबद्ध पोलिसिंग विषयावर त्यांनी अनेकदा भूमिका मांडल्या आहेत.

सात भाषा अवगत असलेले आयजी

महानिरीक्षक शर्मा यांना वाचनाची आवड आहे. त्यांना संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली आणि भोजपुरी या सात भाषा अवगत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध वाळू चोरीवर राज्यभर कडक कारवाई करणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संबंधित बातम्या