लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेला मारहाण

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा  : सातारा तालुक्यातील लिंब गावातील चतुरबेट परिसरात कौटुंबिक वादातून एका ६५ वर्षीय महिलेला लाकडी स्टिकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब गावातील चतुरबेट येथे १५ मे रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. वत्सला हणमंत सावंत (वय ६५) यांना सोहम सुभाष सावंत (रा. लिंब) याने “तू वहिनीला कुठे लपवले आहे?” असा जाब विचारत संतापाच्या भरात मारहाण केली. आरोपीने हातातील लाकडी स्टिकने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास महिला पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापूरमध्ये बिअर बारसमोर हाणामारीप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा; घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण
पुढील बातमी
कोरेगावात दुकान मालकाच्या घरावर कामगाराचा डल्ला; सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या