तमाशा कलावंत सौ. मंगला जावळे व हरी डावाळे यांना यावर्षीचा लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर पुरस्कार जाहीर

by Team Satara Today | published on : 17 May 2026


सातारा : अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृत्यर्थ कोल्हापुर येथील गायन, पेटी तबलावादक उस्ताद हरी किसन डावाळे तसेच जावली तालुक्यातील तमाशा गायिका सौ. मंगला लहू जावळे यांना गायन कलेतील योगदानाबद्दल यमुनाबाई वाईकर तमाशा कलावंत पुरस्कार जाहीर करण्यात  आला आहे. 

सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच नावाने महाराष्ट्रातील गुणी व आदर्श तमाशा कलावंतांना अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटनेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत अशी माहिती या संघटनेचे अध्यक्ष नारायण जावळीकर यांनी दिली आहे. 

या दोन्ही कलाकारांना सन्मानचिन्ह  शाल, बुके व रोख रक्कम  देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

सौ मंगला जावळे व हरी डावाळे या कलावंतांनी पारंपारिक तमाशा क्षेत्रात तमाशा कलावंत म्हणून भरीव स्वरूपाचे काम करून या कलेला योगदान दिले आहे त्यांनी आपली कला अंत:करणापासून जोपासली आहे. त्यांचे या क्षेत्रात केलेले काम लक्षात घेऊन त्यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे नारायण  जावलीकर यांनी सांगितले. हा पुरस्कार लवकरच त्यांना त्यांची घरी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मलकापूर-कराड ते अतित-नागठाणे दरम्यानचे सेवा रस्ते, पूल व गटर्सची कामे तातडीने पूर्ण करा; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश
पुढील बातमी
सातारा पालिकेतील शिस्तभंगावर ना. शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी; जनतेच्या कामात अडथळे सहन न करण्याचा इशारा

संबंधित बातम्या