सातारा : शहरात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आदेश क्र. स्था.गु.शा-२/२५/म.पो.का.क ५५/१३१८/२०२५दि. ४/०७/२०२५अन्वये संबंधितास दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असताना संबंधित युवक सातारा शहरात दि. १५ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील सुविधा अपार्टमेंट समोरील रिक्षा स्टॉप शेजारी आढळून आला. पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी तत्पर कारवाई करत रोहित जितेंद्र भोसले (वय २७, रा. प्रतापसिंह नगर, खेड, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.