सातारा : शहरात हद्दपार आदेशाचा भंग करून विनापरवानगी वावरत असलेल्या युवकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उपविभागीय दंडाधिकारी, सातारा विभाग यांच्या हद्दपार प्रस्ताव क्रमांक हद्दपार/एस.आर./०६/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ) अंतर्गत शुभम कडव यास आदेश देण्यात आले होते. असे असताना दि. १५ रोजी सायंकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील आझादनगर कॉलनी, शाहूपुरी येथील गणेश मंदिरासमोर तो विनापरवानगी वावरताना पोलिसांना आढळून आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार शैलेश अशोक फडतरे यांनी फिर्याद दिली असून शुभम दीपक कडव (वय २४, रा. आझादनगर कॉलनी, शाहूपुरी, ता. जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फरांदे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.