साताऱ्यात शनिवार पेठेत शिवीगाळ व दमदाटी; गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 15 May 2026


सातारा :  शनिवार पेठ परिसरात राहत्या घराजवळ शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. तक्रारदार व विरोधक हे एकमेकांचे ओळखीचे असून कोणतेही कारण नसताना विरोधक हर्षद नईम शेख याने तक्रारदार उमेश भोज यास शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ही घटना दि. १४ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी उमेश दिलीप भोज (वय ३२, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारीवरून हर्षद नईम शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल या करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझारातील वस्तीगृहातून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता; शोधमोहीम सुरू
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट पुलाजवळ महिंद्रा शोरूमच्या पार्किंगमधून होंडा शाईन दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या