शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून १६ हजारांचे स्टील रॉड चोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 May 2026


सातारा : संगमनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा परिसरातून स्टीलचे रॉड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या मेन गेटच्या पाठीमागील बाजूस ठेवलेले विविध मापांचे व किंमतीचे स्टील रॉड फिर्यादीच्या संमतीशिवाय कपटाने चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली आहे. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये अंदाजे १० मिमी जाडीचे १ मीटर लांबीचे १०० स्टील रॉड, १६ मिमी जाडीचे २ मीटर लांबीचे २५ स्टील रॉड तसेच १० मिमी जाडीचे १.५ मीटर लांबीचे ८८ स्टील रॉड असा एकूण १६ हजारांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याबाबत विशाल पांडुरंग नलवडे (वय ४४, धंदा – नोकरी, स्टोअर असिस्टंट, रा. वाढे, जि. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण शिवाजी निकम (रा. मुळीकवाडी, ता. जि. सातारा) व चंद्रकांत अशोक सक्रेनवर (रा. प्रतापसिंहनगर, ता. जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म.पो.ह.वा. सपकाळ करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात राधिका रोडवर दारूच्या नशेत आरडाओरडा करणाऱ्या दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
साताऱ्यात ९ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; युवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल

संबंधित बातम्या