सातारा : राधिका रोड परिसरातील हॉटेल राजतारा समोरील सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना दि १३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हॉटेल राजतारा समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) नुसार पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे.
संतोष शहाजी पीटेकर (वय २०, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आणि सुरज कांता दांडे (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास म.पो.ह.वा. शिंदे आणि पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.