जकातवाडी येथील तरुण बेपत्ता; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

by Team Satara Today | published on : 14 May 2026


सातारा : जकातवाडी (ता. सातारा) येथील एक तरुण घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून, तो अद्याप घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी चिंतेतून बेपत्ता असल्याची नोंद केली आहे.

याबाबत विशाल अरुण भोसले (वय ३१, रा. जकातवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुरज अरुण भोसले (वय ३३, रा. जकातवाडी, ता. जि. सातारा) हे कोणालाही न सांगता घरातून निघून गेले असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत. नागरिकांना संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा दणका; सातारा शहर परिसरातील 10 जणांची टोळी तडीपार
पुढील बातमी
साताऱ्यात राधिका रोडवर दारूच्या नशेत आरडाओरडा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या