गोडोली येथे मुलांच्या खेळण्यावरून वादातून महिलेशी गैरवर्तन; शहर पोलिसांत विनयभंगाची फिर्याद

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा : गोडोली येथे मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून महिलेशी गैरवर्तन व दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय शिक्षक महिलेने शहर पोलिसांत विनयभंगाची फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्यासह तिच्या पतीला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच फिर्यादी महिला आणि दुसऱ्या महिलेला स्पर्श केला व ढकलले अशा प्रकारे त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी संजय कदम (रा. गोडोली, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझार परिसरात लक्ष्मीटेकडी येथे कुऱ्हाडीने मारहाण; अल्पवयीन युवक गंभीर जखमी, तिघांवर गुन्हा
पुढील बातमी
लिंब फाटा येथे बंद घर फोडून दागिने व रोख रक्कम चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या