सातारा : एसटी बसस्थानक परिसरात परवान्याविना आणि निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्री केंद्रावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली.
सेव्हन स्टारजवळील ‘साई स्नॅक्स सेंटर’विरोधात पोलिसांनी पंचनामा करून अमोल नलावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आस्थापन नियमांचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.