सातारा : सार्वजनिक ठिकाणी वाहनांवर बसून मद्यपान करणाऱ्या चौघांवर शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत.
जुना मोटार स्टँड परिसरात मोपेडवर बसून मद्यप्राशन करताना गोपाल उधाणे व अमर कारंडे आढळले. तर भोसले मळा भागात अॅक्टिव्हावर बसून दारू पिणाऱ्या आकाश भिंगारदेव व राज सपकाळ यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.