पोवई नाका परिसरात किरकोळ वादातून आईस्क्रीम विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा : पोवई नाका परिसरात “वाद इतरत्र जाऊन करा” असे सांगितल्याच्या कारणावरून एका आईस्क्रीम व्यावसायिकास मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लोखंडी रॉडचा वापर करून झालेल्या या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले.

हेम एजन्सीसमोरील दुकानाजवळ शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. विश्वजीत पवार यांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या नातेवाईकालाही मार बसला.

अभिषेक गोरे, शंतनु गोरे, अथर्व साबळे, सौरभ साबळे, ओमकार शिंदे, अमर कांबळे, आदित्य बोडके यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पिसाळ करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मैदानातील वाद विकोपाला; दोन गटांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत, महिलेसोबत गैरप्रकाराची तक्रार
पुढील बातमी
साताऱ्यात रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर शहर पोलिसांची धडक कारवाई

संबंधित बातम्या