मैदानातील वाद विकोपाला; दोन गटांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत, महिलेसोबत गैरप्रकाराची तक्रार

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा : गोडोली परिसरातील दत्त मंदिराजवळील मैदानात मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेत एका महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला असून शहर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

रविवारी सायंकाळी फिर्यादी कुटुंबीयांसह मैदानावर चर्चा करण्यासाठी गेले असता आरोपींकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी महिलेला धक्काबुक्की करून तिच्या अंगावरील ओढणी खेचल्याचाही आरोप आहे. दगडफेकीत एकजण जखमी झाला.

अजित देशमुख, सुधीर तुपे, यश तुपे, तुषार शिरसागर आणि अनिकेत निकम यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस नाईक बोराटे तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घटस्फोटासाठी दबाव टाकत विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा, मारहाण, धमक्या आणि बदनामी केल्याचा आरोप
पुढील बातमी
पोवई नाका परिसरात किरकोळ वादातून आईस्क्रीम विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

संबंधित बातम्या