सातारा : येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार्याने 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये दिलीपराज ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ येथे होणार्या या ग्रंथोत्सवामध्ये दिलीपराज प्रकाशनची सर्वोत्कृष्ट पुस्तके 35 टक्के सवलतीत वाचकांना उपलब्ध होणार आहेत.
दररोज सायंकाळी चार ते आठ या कालावधीमध्ये पुस्तक विक्री केली जाणार आहे,. या पुस्तकपर्व ग्रंथ भंडाराचा शुभारंभ 15 मे रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून यावेळी विनोद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, काका पाटील, डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, मुकुंद फडके विजय साबळे उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा आणि शब्दांच्या दुनियेत रममाण होऊन मराठी पुस्तकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शिरीष चिटणीस, विनायक भोसले यांनी केले आहे