सातारा : एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी वाघाची नळी, देवी चौक, सातारा येथे वैभव सुरेशराव पाटील (रा. शाहूपुरी, सातारा) यांना जुन्या आर्थिक व्यवहारातून लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी इमरान रज्जाक शेख (रा. शुक्रवार पेठ, सातारा० आणि पप्पू उर्फ सचिन मोहिते (मूळ रा. रविवार पेठ, सातारा. सध्या रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.