सातारा : अपघातात वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नागठाणे गावच्या कमानीसमोर कराड-सातारा महामार्गावर ट्रक क्र. एचआर 55 एव्ही 08%1 वरील चालकाने ट्रक बेदरकारपणे चालवून पायी चालत महामार्ग ओलांडून जात असलेले रघुनाथ दिनकर माळी वय 79, रा. मुंढे, ता. कराड यांना धडक दिली. या अपघातात माळी यांचा मृत्यू झाला असून ट्रकचालक ट्रकसह पळून गेला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पी. पी. शिंदे करीत आहेत.