सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक जिजाबा कदम रा. कारंडवाडी, ता. सातारा यांची पोवई नाका परिसरातील बढीये पेट्रोल पंपाशेजारी लावलेली दुचाकी क्रमांक (एमएच 11 डीजे 3401) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.