सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोडोली येथील एक विवाहिता राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.