नागठाणे येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त

by Team Satara Today | published on : 09 May 2026


सातारा : बोरगाव पोलिसांनी नागठाणे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाणे गावातील भाजी मंडई शेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या बंद दुकान गाळ्यासमोरील पायरीवर काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईत एकूण १ हजार ५३५ रुपयांची रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी निशांत रामचंद्र साळुंखे (वय ४८, रा. नागठाणे, ता. जि. सातारा) यांच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार
पुढील बातमी
गजवडी येथे दुकानासमोरून दुचाकी चोरीस

संबंधित बातम्या