सातारा : शहरातील शाहूपुरी परिसरातून एक युवक घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर अशोक चव्हाण (वय २९, रा. गेंडामाळ, कब्रस्तान समोर, शाहूपुरी, सातारा) हे दिनांक ८ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडले. त्यानंतर ते परत घरी न आल्याने कुटुंबीयांनी सातारा शहर परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही.याप्रकरणी देवयानी अमर चव्हाण (वय २९, रा. गेंडामाळ, कब्रस्तान समोर, शाहूपुरी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार ए. कारंडे करीत आहेत.