गुरुवार बाग परिसरातून दुचाकी चोरी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 09 May 2026


सातारा : शहरातील गुरुवार बाग परिसरातून घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानु शेटोबा पिटेकर (वय ३७, रा. नामदेववाडी, ता. जि. सातारा, सध्या रा. गुरुवार बागेजवळ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची एमएच-११-डीसी-८२२८ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल घरासमोरील रस्त्यावर उभी करण्यात आली होती.

काळ्या रंगाची तसेच लाल-जांभळ्या पट्ट्या असलेली ही मोटारसायकल अंदाजे ५० हजार रुपये किमतीची असून अज्ञात चोरट्याने ती चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना दिनांक ७ रोजी रात्री साडेअकरानंतर घडली.

या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा; विद्रोही साहित्य संमेलनाचा उत्साहात शुभारंभ, लोकसंस्कृती, सामाजिक विचार आणि क्रांतीच्या संदेशाने रंगली मिरवणूक
पुढील बातमी
साताऱ्यातील शासकीय मेडिकल कॉलेज गेटजवळ तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या