पांढरवाडी, कोडोली येथे महिलेसह आई व मुलाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 08 May 2026


सातारा : पांढरवाडी (कोडोली) येथे माहेरी असताना एका महिलेसह मुलाला तसेच तिच्या आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सायली अक्षय शिंदे (वय २८, रा. मारुती मंदिर समोर, सदरबझार, सातारा) या माहेरी पांढरवाडी, कोडोली येथे असताना आरोपी मंगेश चंद्रकांत नलावडे व गौरी मंगेश नलावडे (दोघे रा. पांढरवाडी, कोडोली, ता. जि. सातारा) यांनी घरी येऊन फिर्यादीच्या मुलगा वेदांश याच्या कानाखाली मारली. तसेच फिर्यादीच्या पोटात लाथा मारून, तोंडावर बुक्क्या मारत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या झटापटीत फिर्यादीची आई साधना महाडीक यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांना ढकलून दिल्याने डोक्याला मार लागला असून डाव्या हाताच्या करंगळीला फ्रॅक्चर झाल्याची नोंद आहे.

घटनेनंतर फिर्यादी सायली शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मंगेश नलवडे आणि गौरी नलवडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आत्याचे दागिने जबरीने हिसकावणारा भाचा जेरबंद ; मेढा पोलिसांची कारवाई; सोन्याचे दागिने १०० टक्के जप्त
पुढील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आझादनगर कॉलनीतील युवकाविरुद्ध शाहूपुरी ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या