कराड बसस्थानक परिसरात दोघा मित्रांवर कोयत्याने हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल; पोलीस वेळीच दाखल झाल्यामुळे जीव वाचला

by Team Satara Today | published on : 06 May 2026


कराड : आम्ही कराडचे भाई आहोत, विजय चौकात का थांबला असे आम्हाला विचारणार तू कोण ? असे म्हणत सात जणांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. इरफान आसिफ पठाण (रा. मंगळवार पेठ, कराड) आणि दर्शन शिंदे (गजानन हौसिंग सोसायटी, कराड) या दोघा मित्रांवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

कराड बसस्थानक परिसरात कोयत्यासह दगड व लाथाबुक्क्यांनी साद अश्पाक मुलाणी (आझाद चौक कराड), हुजेफा शब्बीर शेख (गुरुवार पेठ, कराड) या दोघांसह सद्दाम गौसपाक शेख (कार्वे नाका, कराड), शोएब मोमीन (रा. रैनाक गल्ली, कराड), फरहान शेख (मुजावर कॉलनी कराड), अकरम मुल्ला (पाली, ता. कराड) आणि अनोळखी एक अशा सात जणांनी पठाण व शिंदे यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यावेळी परिसरातील रिक्षाचालक आणि नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. सुदैवाने पोलीस वेळीच दाखल झाल्यानंतर पठाण व शिंदे यांचा जीव वाचला असून दोघांवर कराडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कचरा डेपो कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही; कुमठे ग्रामस्थांचा इशारा, मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले
पुढील बातमी
दारू पिण्यासाठी शंभर रूपये न दिल्याने अनोळखी व्यक्तीने मजुरास चाकूने भोसकले; आगाशिवनगर येथील घटना

संबंधित बातम्या