एनसीईआरटी नकाशाप्रकरणी वृषालीराजेंची इतिहासकार सदानंद मोरेंशी चर्चा; अभ्यासपूर्ण व शास्त्रशुद्ध भूमिका घेण्यावर भर

by Team Satara Today | published on : 06 May 2026


सातारा  :  एनसीईआरटीकडून इयत्ता आठवीच्या इतिहास अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा निश्चित करण्यासाठी श्री. छ. वृषालीराजे भोसले यांनी ज्येष्ठ इतिहासकार सदानंद मोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या सदिच्छा भेटीत संबंधित विषयाचे ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सामाजिक पैलू सखोलपणे चर्चिले गेले. इतिहास हा केवळ भावनांचा विषय नसून तो ठोस पुराव्यांवर आधारित असावा आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत अचूक स्वरूपात पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे मार्गदर्शन मोरे यांनी केले.

तसेच, एनसीईआरटीच्या या निर्णयाकडे केवळ आंदोलनाच्या दृष्टीने न पाहता, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रशुद्ध भूमिका घेणे गरजेचे असल्याची भूमिका या चर्चेतून पुढे आली. त्यामुळे या विषयावर पुढील काळात सकारात्मक व अभ्यासाधिष्ठित पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी सौ. सुरेखा मोरे, अमृता मोरे, समीर दादा जाधवराव तसेच इतिहास अभ्यासक राहुल मोकाशी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या सभेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका; ७ एप्रिलच्या सभेत विषय चर्चेविना मंजुरीचा आरोप; कारवाई न झाल्याने सुशांत मोरे यांची न्यायालयात धाव
पुढील बातमी
नकाशा वगळल्याप्रकरणी राजघराण्यांतील वंशजांची हायकोर्टात धाव; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

संबंधित बातम्या