सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी बोरगाव पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अविनाश अरविंद साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा) हे पाडळी, ता. सातारा येथील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या एका उघड्या पत्राच्या शेडमध्ये अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1 हजार 40 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.