सातारा : अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास किरण भीमराव साबळे (रा. साबळेवाडी, ता. सातारा) हा त्याच्या दुचाकीवरून वेण्णानगर, ता. सातारा येथे अवैधरित्या दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून दुचाकी व देशी दारूच्या बाटल्या असा एकूण 37 हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.