सातारा : सातारा शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका युवतीसह एक महिला बेपत्ता झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोडोली येथील एक 23 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 22 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनगर येथील एक महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.