तीन राज्यातील भाजपच्या विजयाचा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोरेगावात जल्लोष; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणला

by Team Satara Today | published on : 04 May 2026


कोरेगाव : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या नेत्रदीपक यशाचा आनंद कोरेगावात सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी जुना मोटार स्टँड परिसरात जोरदार जल्लोष केला.

यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थित कार्यकर्त्यांनी नागरिकांना व प्रवाशांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमाला आमदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजप तालुकाध्यक्ष निलेश यादव, शहराध्यक्ष दीपक फाळके, भाजयुमो शहराध्यक्ष ॲड. केदार केंजळे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, महेश शामराव बर्गे, नगरसेवक राजेंद्र वैराट, संतोष बर्गे, प्रदीप आंबेकर, हरिष जरंडे, नगरसेविका संजीवनी बर्गे, वनमाला बर्गे, स्नेहल आवटे, शीतल बर्गे, पोपटराव भिलारे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचेही त्यांनी कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; आरोपीला शासन केले जाईल उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
पुढील बातमी
महाबळेश्वर तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे होणार नियमित- ​तहसीलदार सचिन म्हस्के यांची माहिती; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या