जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा  :  पोलिस विभाग आणि आरोग्य विभागाने जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम प्रभावीपणे राबवावी.  बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

बोगस डॉक्टर नियंत्रणासाठीच्या जिल्हासतरीय समितीची बैठक  जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी या सूचना दिल्या. 

नागरिकांना बोगस डॉक्टर विषयी माहिती समजल्यास त्यांनी  नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी.  तसेच पोलीस विभागानेही मोहिमेमध्ये स्थानिक पोलिस पाटील यांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घ्यावे पॅथॉलॉजी लॅबची ही तपासणी करावी. यासाठी पोलिस व आरोग्य विभागाने शोध मोहीम राबवावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षल चिकणे यांची वर्णी ; जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांनी केली घोषणा: संघटनात्मक निवडीत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा वरचष्मा
पुढील बातमी
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या राहिलेल्या तीन मोर्चांच्या आणि अठरा आघाड्यांच्या नियुक्ती जाहीर

संबंधित बातम्या