भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षल चिकणे यांची वर्णी ; जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांनी केली घोषणा: संघटनात्मक निवडीत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा वरचष्मा

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा  : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी हर्षल चिकणे यांची निवड जाहीर झाली. हर्षल चिकणे हे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत. निवडीची घोषणा होताच सातारा शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

आज झालेल्या सातारा जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडीत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वरचष्मा दिसून आला.हर्षल चिकणे यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहून आपली निष्ठा जपली. कोणतेही पद नसताना हर्षल चिकणे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे कार्य करत युवकांची संघटनात्मक बांधणी करून पक्षाशी नातं टिकवलं. 

या निष्ठेमुळे सातारा तालुक्याला हर्षल यांच्या रूपाने न्याय मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे, खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष व आमदार अतुल भोसले, आणि आमदार मनोज घोरपडे यांनी हर्षल यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवला. त्यांच्याकडे युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या निवडीनंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. साताऱ्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मद्यप्राशन करण्यासाठी ग्राहकांना सुविधा पुरवल्याप्रकरणी हॉटेल मालकावर गुन्हा
पुढील बातमी
जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या