सातारा : अवैधरित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महिताब जब्बार शेख (रा. कोंडवे, ता. सातारा) हा त्याच्या वाहनामधून अवैधरित्या दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून 29 हजार चारशे रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या आणि वाहन हस्तगत करण्यात आले आहे.