पवनचक्कीमधील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा : पवनचक्कीमधील तांब्याच्या तारा चोरणारी तीनजणांची टोळी जेरबंद करुन त्यांच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघड करुन एकुण 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

प्रकाश निवृत्ती निकम (वय 34 वर्षे), नवनाथ गुलाब कदम (वय 23 वर्षे), पंकज आनंदा कदम (वय 25 वर्षे, सर्व रा. जांभेकरवाडी, ता. पाटण जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 ऑक्टोबर 2025 ते 15 जानेवारी 2026 दरम्यान सडावाघापुर व वनकुसवडे, ता. पाटण, जि.सातारा परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायरची चोरी झाल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यांच्या अनुशंगाने तसेच यापुर्वी देखील पवनचक्कीमधील केबल वायर चोरी झालेली असल्याने पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या गुन्ह्यासह पवनचक्कीमधील केबल वायर चोरीचे गुन्हे करणार्‍या चोरट्यांची माहिती काढून हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या आरोपींची माहिती काढून हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

दरम्यान विश्वजीत घोडके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पवनचक्कीमध्ये चोरीस गेलेली केबल वायर ही प्रकाश निकम, नवनाथ कदम, पंकज कदम रा. जांभेकरवाडी ता. पाटण जि. सातारा यांनी चोरली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी ही माहिती पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर यांना देत संबंधितांना ताब्यात घेवून विचारपूस करुन पुढील कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दातीर यांच्या पथकाने जांभेकरवाडी परिसरातून संबंधितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सडावाघापुर व वनकुसवडे ता.पाटण या परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरलेली 1 लाख 13 हजार रुपये किंमतीची 260 किलो केबल वायर मधील तांब्याची तार हस्तगत करण्यात आली आहे. या तीनही संशयितांना अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.

या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कवठेकर, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोउनि परीतोष दातीर, विश्वास शिंगाडे, पाटण पोलीस स्टेशनचे पोउनि चव्हाण, पोउनि सदगर, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सफौ. अतीष घाडगे, राजु मुलाणी, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, चालक सफौ. शिवाजी गुरव व पाटण पोलीस स्टेशनचे अंमलदार सफौ आव्हाड, पोकॉ. कदम, गुरव, मोरे यांनी सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमदार महेश शिंदेकडून पदाधिकार्‍यांना डावलले जाते - हरिदास जगदाळेंचा आरोप; कोरेगावच्या राजकारणात पुन्हा खळबळ
पुढील बातमी
राज्यात कायदा व सुव्यवस्था न राखल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - उमेश चव्हाण यांची मागणी; साताऱ्यात 20 रोजी सरकारविरुध्द मोर्चा

संबंधित बातम्या