कराडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुसज्ज कार्यालय साकारणार; आमदार अतुल भोसले यांची माहिती

by Team Satara Today | published on : 03 May 2026


कराड : कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या (PWD) नवीन प्रशासकीय कार्यालयाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिली असून, या भव्य कार्यालयासाठी चालू आर्थिक वर्षात आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यालयाची रचना अत्यंत आधुनिक आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून, लवकरच या इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

​शासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हे नवीन कार्यालय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या वास्तूमुळे अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार असून, कराडच्या वैभवात ही वास्तू मोलाची भर घालेल, असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनियर कॉलेजचा बारावीचा निकाल 96.55 टक्के

संबंधित बातम्या