पाण्याचा 40 हजार रुपये किंमतीचा वॉल चोरणा-यावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा  :  बेकायदेशीररित्या पाण्याचा वॉल जवळ बाळगल्याप्रकरणी सैद अहमद खान (वय 21, रा. शाहूनगर गोडोली सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवार दि. 1 मे रोजी चारभिंती येथील पाण्याच्या टाकी परिसरात सैद खान यांच्या जवळ पो.कॉ. संतोष घाडगे यांना 40 हजार रुपये किंमतीचा पाण्याचा वॉल मिळून आला. खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोणतीही माहिती दिली नाही. यामुळे हा वॉल त्याने चोरुन आणल्याच्या संशयावरुन त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हवा घोडके करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूथ येथे विनापरवानगी साउंड सिस्टीम लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या