सातारा : राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथून सुरु झालेल्या या जयंती सोहळ्याच्या सांगता साताऱ्यात होणार आहे. या सांगता सोहळ्यास राष्ट्रीय काँग्रेस नेते खा. राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दोघांचा जीवन संघर्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा हा मुख्य उद्देश असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भानुदास माळी यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, मनीषा साळुंखे, मनोज तपासे, सादिक बागवान, जगन्नाथ कुंभार, मालन परळकर आदी उपस्थित होते. माळी म्हणाले, महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती उत्सव वर्षभर राज्यभरात कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हयात कार्यक्रम राबवले जाणार असून सांगता सभा सातारा जिल्हयात होणार आहे. नायगाव किंवा कटगून येथे सांगता सभा होणार असून त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस नेते खा. राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत.
यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे खासदार व आमदार उपस्थित राहणार आहे. वर्षभरात महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले या दोघांचा जीवन संघर्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा हा मुख्य उद्देश आहे. आताच्या इंग्रजी शाळातीळ पुस्तकात अनेक महापुरुषांचे धडे नसतात. मुलांना महापुरुष माहित असणे गरजेचे असून शाळांना पाठयपुस्तकात त्याचा सहभाग करावा.
सध्या सर्वत्र जनगणना कार्यक्रम सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणूकापूर्वी ओबीसी जनगणना होणार अशी घोषणा केली होती. पण आजच्या जणगनणेत कुठेही ओबीसी कॉलम दिसत नाही. त्यात जनगणनेस बजेट केले असून ते फसवे असल्याचे स्पष्ठ होत आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बागेश्वर महाराज यांनी केलेले वक्तव्य निषेर्धात आहे. ते कोठेही बाहेर जिल्हयात किंवा राज्यात जाताना हेलिकॉप्टरने फिरताना त्यामुळे त्यांना नक्की पैसे कोण पुरवत आहे. त्याच्या संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.