खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत

दोन दिवसात साताऱ्यात येऊन चाहत्यांना देणार 'जादूची झप्पी

by Team Satara Today | published on : 01 May 2026


सातारा : भारतीय जनता पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रकृती पूर्णपणे उत्तम असून, केवळ नियमित आरोग्य तपासणीसाठी ते पुणे येथील रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आले आहे.

​खासदार उदयनराजे भोसले हे केवळ 'रुटीन चेकअप'साठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये गेले होते. सर्व आवश्यक तपासण्यांनंतर त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती त्यांच्या मित्र समूहाने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विविध उलटसुलट चर्चांना उधाण आले होते, मात्र रुग्णालयातील तपासणीनंतर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

​सातारकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे खासदार उदयनराजे येत्या दोन दिवसात साताऱ्यात दाखल होणार आहेत. सातारा दौऱ्यावर आल्यानंतर ते नेहमीप्रमाणे आपल्या मिश्किल शैलीत मित्र परिवार, चाहते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून सर्वांना 'जादूची झप्पी' देणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सलग सुट्ट्यांच्या सुनामीमुळे पुणे-बेंगलोर महामार्ग ओसंडला; खंबाटकी ते आनेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुढील बातमी
कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

संबंधित बातम्या