सातारा : डबेवाडी परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करिना नवनाथ माने (वय २१) ही तरुणी दि २७ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास डबेवाडी येथील राहत्या घरातून “मैत्रिणीकडे जाऊन येते” असे सांगून बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली; तरीही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही.
याप्रकरणी तिचे वडील नवनाथ प्रल्हाद माने (वय ५१, मूळ रा. डबेवाडी, ता. जि. सातारा, सध्या रा. ७८२, शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निकम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.