सातारा : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानमित्त राष्ट्रध्वजवंदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुक्रवार दि. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा सकुल येथे होणार आहे.
या ध्वजवंदन कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.