सातारा : सातारा तालुक्यातील कुमठे गावात जमीन वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शेखर रघुनाथ जाधव (वय ५४) हे जखमी झाले आहेत.
शेतात काम सुरू असताना वाद वाढला आणि आरोपीने डोक्यावर कोयत्याने वार केला. त्यानंतर अन्य दोघांनीही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.